घराची भिंत व छप्पर कोसळून झाले होते नुकसान
आचरा प्रतिनिधी
गेले काही दिवस आचरा पंचक्रोशीत मुसळधार पावसाने अक्षरशः चांगलेच झोडपून काढले आहे. मालवण तालुक्यातील वायंगणी- तळेकरवाडी येथील महादेव नारायण सावंत यांच्या घराची मातीची भिंत व छप्पर कोसळली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच वायंगणी पोलीस पाटील सुनील त्रिंबककर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
वायंगणी येथे बुधवारी पहाटे महादेव सावंत यांचा मातीच्या घराची भिंत व छप्पर कोसळले. यात घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. महादेव सावंत हे वृद्ध असून ते एकटेच घरी असतात.ही घटना समजल्यावर वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, प्रमोद सावंत, नाना सावंत यांनी भेट देत पहाणी केली व सावंत यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मधून रोख रक्कम मदत म्हणून दिली.