दुरुस्तीसाठी नेले जात असताना हवेत संतुलन बिघडले
केदारनाथ :
उत्तराखंडमधून एअरलिफ्ट केलेले हेलिकॉप्टर शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास खाली पाडावे लागले. केस्ट्रल एव्हिएशनचे हेलिकॉप्टर एमआय-17 विमानाने दुरुस्तीसाठी नेले जात होते. एअरलिफ्ट दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे एमआय-17 चा तोल गेला. त्यानंतर अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पायलटने ते सुरक्षित ठिकाणी खाली टाकावे लागले.
वारा आणि हेलिकॉप्टरच्या वजनामुळे एमआय-17 चा तोल बिघडल्याचे जिल्हा पर्यटन अधिकारी राहुल चौबे यांनी सांगितले. पायलटने अत्यंत सावधगिरीने सदर हेलिकॉप्टर थारू पॅम्प खोऱ्यातील रिकाम्या जागेवर टाकले. येथे लोकवस्ती नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पडलेल्या केस्ट्रेल एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचे 24 मे रोजी केदारनाथमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. तेव्हापासून ते हेलिपॅडवरच उभे होते. शनिवारी सकाळी ते गौचर एअरबेसवर दुरुस्तीसाठी नेले जात होते.