अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे वाद
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडुन प्रस्तावित नवे गोल्डन कार्ड म्हणजेच ग्रीनकाडं स्थलांतरितांना अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्याचा अधिकार देत नसल्याचे वक्तव्य उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी केले आहे. ट्रम्प यांनी मागील महिन्यात गुंतवणुकदारांसाठी 35 वर्षे जुन्या व्हिसाच्या ऐवजी 50 लाख डॉलर्समध्ये गोल्ड कार्ड सादर करण्याच्या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार हे कार्ड खरेदी करणारे लोक अमेरिकन नागरिकत्वासाठी पात्र असतील. स्थायी नागरिकत्वाच्या व्हिसाला ग्रीन कार्ड देखील म्हटले जाते, जो भारतीयांसमवेत अनेक विदेशी नागरिकांना अमेरिकत वास्तव्य अन् काम करण्याची अनुमती देतो. परंतु वेन्स यांनी स्थायी वास्तव्याचा अर्थ स्थलांतरितांना ही सुविधा आजीवन मिळणे असा नसल्याचे वेन्स यांनी म्हटले आहे.
ग्रीन कार्ड मिळण्याचा अर्थ याच्या धारकांना अमेरिकेत राहण्याचा अनिश्चित काळासठी अधिकार मिळणे नव्हे. हे मूळ स्वरुपात अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी देखील नाही. हे राष्ट्रीय सुरक्षेविषयी आहे, परंतु याहून अधिक महत्त्वपूर्ण म्हणजे आम्ही एक अमेरिकन नागरिक म्हणून कुणाला स्वत:च्या राष्ट्रीय समुदायात सामील करू शकतो हा निर्णय घेण्याचा अधिकार देतो. संबंधित व्यक्ती अमेरिकेत राहू नये असे विदेश मंत्री किंवा अध्यक्ष ठरवत असतील तर त्याला अमेरिकेत राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही असे उद्गार वेन्स यांनी काढले आहेत.









