ऑनलाईन टीम/तरुण भारत
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी दोन दहशतवाद्यांनी जम्मूतील राजोरी जिल्ह्यातील लष्करी चौकीवर आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये तीन जवान शहीद झाले. तर, चार तासांच्या चकमकीनंतर दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले. तर आज देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचवणाऱ्या घातपाताचा कट उधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. देशाची राजधानी दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी २ हजार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच, पोलिसांनी दिल्लीत काडतुसे पुरवणाऱ्या ६ आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी काडतुसे पुरवठादाराला पूर्व दिल्ली पोलिसांनी आनंद विहार परिसरातून अटक केली आहे. सध्या आरोपी ही २ हजार जिंवत काडतुसे कोणाला देणार होते. तसेच, याचा वापर कुठे केला जाणार होता. याबाबतची चौकशी केली पोलिसांकडून केली जात आहे. त्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था कड करण्यात आली आहे. १५ ऑगस्टनिमित्त दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विहार परिसरात दोन संशयितांकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद विहार परिसरात साफळा रचून संशयिताची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून २ हजार जिवंत काडतुसे असलेल्या दोन पिशव्या जप्त केल्या. त्यानंतप पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांची चौकशी करत आहेत.









