
बेळगाव : सावगाव येथे जय हनुमान कुस्तीगिर संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने धुलिवंदनानिमित्त व परशराम सावगाव यांच्या स्मरनार्थ प्रतिवर्षाप्रमाणे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवार दि. 7 रोजी सांगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. य् ाा मैदानात प्रमुख कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे वि. पंजाब चॅम्पियन रुपचंद पंजाब तर दुसरी प्रमुख कुस्ती महानभारत केसरी कोल्हापूरचा माऊली जमदाडे वि. पंजाब केसरी हंपीसिंग पंजाब यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूरचा मस्कर पाटील वि. यशवंत केसरी पुण्याचा उदय खांडेकर, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिरादार वि. राष्ट्रीय चॅम्पियन कोल्हापूरचा सतीश खरात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती धुळा पांढरे वि. शिवया पुजारी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील कंग्राळी वि. मारुती कोरनाळा यांच्यात होणार आहे. त्याशिवाय आकर्षक कुस्ती कर्नाटक कुमार रोहण घेवडे वि. राष्ट्रीय पदक विजेता विकी करे पुणे, पार्थ कंग्राळी वि. सुमित कडोली, मंथन सांबरा वि. कुणाल यळ्ळूर, स्वप्निल सावगाव वि. दर्शन संतिबस्तवाड याशिवाय 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.









