A grand social drama competition at Kalvibandar
नवतरुण उत्साही नाट्य मंडळ केळूस-कालवीबंदर चे सलग 19 व्या वर्षी आयोजन
नवतरुण उत्साही नाट्य मंडळ केळुस-कालवीबंदर व ग्रामस्थ यांच्यावतीने सलग 19 व्या वर्षी दि. 22 मार्च ते 30 मार्च 2023 या कालावधीत सामाजिक नाट्य स्पर्धेचे आयोजन कालवीबंदर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरा नजीक करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास रुपये 20 हजार तसेच फिरता गणपतीचा चषक व कायमस्वरूपी चषक, द्वितीय क्रमांक रुपये 15 हजार तसेच फिरता नटराज चषक, तृतीय क्रमांक रुपये 10 हजार तसेच फिरता लक्ष्मी चषक, त्याचप्रमाणे इतर वैयक्तिक बक्षीसात आकर्षक चषक उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट खलनायक, उत्कृष्ट बालकलाकार, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट नेपथ्य योजना व उत्कृष्ट पार्श्वसंगीत यांना देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येक नाट्यमंडळास 6 हजार रुपये मानधन नाट्यमंडळाकडून देण्यात येणार आहे.
या सामाजिक नाट्य स्पर्धेसाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 अशी असून सहभाग घेणाऱ्या मंडळांनी या संदर्भातील अधिक माहितीसाठी नवत्रण उत्साही नाट्य मंडळाचे अध्यक्ष आपा ताम्हणकर मोबाईल नंबर 8275773514 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन नवतरुण उत्साही नाट्य मंडळ केळूस-कालवीबंदर यांनी केले आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









