ओरोस पिठढवळ नदीमध्ये केले श्रीफळ अर्पण
प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी
नारळी पौर्णिम निमित्त सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील रिक्षा चालक-मालक युनियनच्या वतीने ओरोस रवळनाथ मंदीर ते पिठढवळ नदी पर्यंत भव्य रॅली काढत सर्वांनी पिठढवळ नदीला श्रीफळ अर्पण करण्यात आले व नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नारळी पौर्णिमे निमित्त दरवर्षी रिक्षा चालक युनियन मार्फत रॅली काढून उत्सव साजरा केला जातो यार्थी ओरोस रवळनाथ मंदीर मध्ये सर्व रिक्षा चालक-मालक एकत्रीत येत ओरोस रवळनाथ मंदीर पासून ओरोस फाटा जिजामाता चौक ते पिठढवळ नदी अशी ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत व गुलाल उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये रिक्षा युनियनचे अध्यक्ष नागेश ओरोसकर, उपाध्यक्ष अंकुश पारकर, सचिव प्रविण शिरसाट तसेन सतीश सावंत, दिलीप मुळ्ये, दिगंबर गोसावी, शिवा गोसावी, जयेश साधंत बाळा दळवी विजय सायंत्, बाबु सायंत, संतोष गायडे यांच्यासह सुमारे १०० हुन अधिक रिक्षा चालक-मालक तसेन भाई सावंत, छोटू पारकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परद, पांडूरंग मालणकर, संतोष वालावलकर, विशाल मसुरकर, रमाकांत परब यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.