जैन युवा संघटनेकडून बुलेट रॅली : 50 हून अधिक चित्ररथ मिरवणुकीत सहभागी
बेळगाव : बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढलेल्या शोभायात्रेत ढोल-ताशा पथक, महावीरांच्या जीवन कार्याची माहिती देणारे चित्ररथ, पारंपरिक वाद्य सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आय. अरुण उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र चौक येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्रारंभी विविध मान्यवर व जैन बांधवांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडला. मिरवणुकीमध्ये जैन युवा संघटनेने 100 हून अधिक बुलेटची रॅली काढली होती. 50 हून अधिक चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, टिळकचौक, शेरी गल्ली, कपिलेश्वर उ•ाणपूल, एसपीएम रोड, कोरे गल्ली, गोवावेसमार्गे मिरवणुकीची महावीर भवन येथे सांगता झाली. य् ाावेळी बोलताना न्यायमूर्ती एम. आय. अरुण म्हणाले, आजच्या जीवनात प्रत्येकाने अहिंसेच्या तत्त्वांचे पालन केल्यास प्रत्येकाच्या जीवनात आनंद मिळेल. भगवान महावीरांनी शिकवलेली तत्त्वे ही शाश्वत तत्त्वे असून ती आजच्या पिढीने समजून घेतल्यास अनेक कष्टांपासून दूर होता येईल. आपले मन, वाणी आणि कृती आपल्या नियंत्रणाखाली असेल तर आपण आनंदी जीवन जगू शकतो, असे त्यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्र चौकात झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मनपाचे आयुक्त रुद्रेश घाळी, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या विद्यावती बजंत्री, भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे, विनोद दो•ण्णावर, व्यापारी सचिन पाटील, गोपाळ जिनगौडा आदी उपस्थित होते. राजेंद्र जैन यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अॅड. रवीराज पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नागराज मरेण्णावर आणि अक्षया वाडकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जैन समाजासोबतच जन्म कल्याण महोत्सव कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
भगवान महावीरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन केल्यास जीवन सुखी : न्यायमूर्ती एम. आय. अरुण यांचे प्रतिपादन

जीवन जगताना अहिंसावादी जगावे, शांतीप्रिय जगावे, असे तत्वज्ञान भगवान महावीर यांनी संपूर्ण जगाला दिले आहे. या तत्त्वज्ञानाचे पालन करणारे निश्चितच श्रेष्ठ आहेत, असे उद्गार कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आय. अरुण यांनी काढले. महावीर जयंतीनिमित्त बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये त्यांनी महावीर यांचे तत्त्वज्ञान सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यत्नट्टी होते. न्यायमूर्ती एम. आय. अरुण यांनी सहपत्नीक भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व्यासपीठावर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील, जिल्हा न्यायाधीश हरिषा, बी. जे. गंगाई, जाईंट सेक्रेटरी बंटी कपाई, सदस्य महांतेश पाटील, अॅड. प्रभाकर पवार, आदर्श पाटील, अभिषेक उदोसी, एस. एम. पाटील, रमेश मिसाळे व इतर वकील उपस्थित होते.









