सातारा :
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राजधानी साताऱ्यात गुरूवार, दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच आरक्षण मिळवून देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे जाहीर आभार मानण्यात येणार आहे. यावेळी 5 हजारांहून अधिक मराठे बांधव उपस्थित राहणार आहे. राजधानी सातारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवतीर्थ पोवईनाका, सातारा येथे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सत्कार सोहळा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व जिह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे यांचाही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सत्कार केला जाणार आहे.
सत्कार सोहळ्याच्या प्रारंभी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांचा भव्य सत्कार सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने केला जाणार आहे. यावेळी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची जोरदार आतषबाजी, शिंग तुताऱ्याचा निनाद करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 5 ते 6 हजार जिह्यातील मराठा बांधव या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने सर्वच्या सर्व 11 तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जोरदार तयारी केली आहे. कला वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी दुपारी जिह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची नियोजन बैठक झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
- शिवेंद्रराजेंचा शब्द अन् जरांगे पाटलांनी आंदोलन सोडले
मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केले होते. उपसमितीने राजपत्राचा मसूदा जरांगे पाटील यांना दिल्यानंतर मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे यांच्याशी मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेटियरच्या मुद्यावर चर्चा केली. गॅझेटियर लागू करण्याची जबाबदारी माझी असल्याचा शब्द मंत्री शिवेंद्रराजे यांनी जरांगे पाटील यांना दिला गेला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी राजेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे, असे म्हणत मंत्री शिवेंद्रराजे यांच्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधवांची मोठ्या संख्येने हजेरी होती. आंदोलनाच्या सुरुवातीपासून शासन पातळीवर हालचाली सुरु झाल्या होत्या. न्या. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास मितीने आंदोलनस्थळी भेट दिली होती. जरांगे पाटील यांची भेट घेवून मागण्यांच्या अनूषंगाने चर्चा केली. मंत्रीमंडळाच्या बैठकाचे सत्र सुरु झाले. राज्याचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागले होते. चर्चा होत असताना आंदोलनस्थळ, जमाव या अनुषंगाने न्यायालयीन प्रक्रिया गतीमान झाली होती. राज्यातील सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या होत्या.
उपसमितीच्या सदस्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे व इतर मंत्र्यांनी हैद्राबाद गॅझेटरच्या अनुषंगाने तयार केलेल्या राजपत्राचा मसूदा घेवून आझाद मैदानावर पोहचले. त्यांनी राजपत्राचा मसूदा जरांगेंना सुपूर्द केला. त्याचवेळी मसुद्याचे अर्थ तपासून पाहिले. त्याचवेळी जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेटियरचा उल्लेख नसल्याचे प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी त्याबाबत एक महिन्यात कार्यवाहीचे आश्वासन देत चर्चेची सुत्रे मंत्री शिवेंद्रराजेंच्याकडे सोपवली. त्यावेळी मंत्री शिवेंद्रराजेंनी सातारा गॅझेटियरची जबाबदारी माझी, असा शब्द जरांगे पटील यांना दिला. यावर राजे तुमचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतोय, तुमच्याशिवाय आम्ही कोणाला मोजत नाही, असे म्हणत ठोस कार्यवाही करण्याबाबत शिवेंद्रराजेंना विनंती केला








