प्रतिनिधी /सांखळी
सांखळी मतदारसंघात पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, आमोणा, न्हावेली, हरवळे आणि सांखळी शहरातील उम्मीद केंद्रे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार बनलेला आहे. वाचनासाठी वर्तमानपत्र, मनोरंजनासाठी टी.व्ही, खेळण्यासाठी कॅरम ची सोय करण्यात आली आहे. यामुळे आम्हाला म्हातारपणी ही स्वतंत्र पणे उम्मीद केंद्रात खेळता बागडता येत असल्याची माहिती काही ज्येष्ठ नागरिकांनी दिली.
सांखळी मतदारसंघात आज नागरिकांसाठी उम्मीद केंद्र नवसंजीवनी ठरत आहे. तसेच सामाजिक सुरक्षा योजना ही या लोकांसाठी सरकारचे वरदान ठरत आहे. ज्या माणसाने गेली साठ वर्षे राज्यात विविध प्रकारे सेवा बजावली अशा नागरिकांचा राज्यात हा एक सन्मानच आहे. असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.









