किंचित स्पर्शावरही होतात असह्य वेदना
ऑस्ट्रेलियात एका 10 वर्षीय मुलीला कॉम्प्लेक्स रीजनल पेन सिंड्रोम नावाचा आजार आहे. या आजारामुळे त्याला कुणीही स्पर्श केल्यावर उजव्या पायात असह्या वेदना होतात. या मुलीला स्नान करता येत नाही तसेच कपडे परिधान करता येत नाहीत. उजव्या पायात होणाऱ्या वेदनांमुळे कागदाचा स्पर्श झाला तरीही ती ओरडू लागते.

या मुलीचे नाव बैला मेसी आहे. सीआरपीएसमुळे तिचा पूर्ण वेळ बेड किंवा व्हिलचेअरवर रुग्णालयात ये-जा करत जात आहे. सीआरपीएसला मानवासाठी सर्वात वेदनादायी स्थिती मानले जाते. बैलाचे कुटुंब फिजीमध्ये फॅमिली हॉलिडेवर असताना त्यांना सीआरपीएसविषयी कळले. फॅमिली हॉलिडेदरम्यान बैलाच्या उजव्या पायात झालेली जखम चिघळली. यानंतर तिची प्रकृती बिघडू लागली. तिच्या कंबेरपासून पूर्ण उजव्या पायाची हालचाल होणे बंद झाले. यामुळे तिला व्हिलचेअरची मदत घ्यावी लागली.
बेलाच्या कुटुंबाने या दुर्लभ आजारावरील उपचारासाठी अमेरिकेच्या डॉक्टरांकडून मदत मागितली आहे. परंतु यासाठी येणारा खर्च अधिक असल्याने ते गो फंड मी मोहिमेच्या अंतर्गत लोकांकडून आर्थिक मदत मागत आहेत.
सीआरपीएस लोकांच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये शिथिलतेमुळे होतो असे तज्ञांचे मानणे आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये मेंदू आणि कण्याचे हाड सामील असते. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम मेंदू आणि कण्याच्या हाडाद्वारे उर्वरित शारीरिक अवयवांपर्यंत सिग्नल पाठवत असते. यातील बिघाडामळे वेदनादायी सिग्नलवर अधिक प्रतिक्रिया होते, ज्याला नर्वस सिस्टीम रोखू शकत नाही आणि सातत्याने वेदना होत राहतात.









