लांजा :
गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसच्या धडकेत गव्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुऊवार 10 एप्रिल रोजी रात्री 10.30 च्या सुमारास लांजा बागेश्री येथे घडली.
खासगी बस गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना लांजा बागेश्री येथे रस्ता ओलांडणाऱ्या गव्याला बसची धडक बसली. बसचालकाने गाडी आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गव्याचा बसखाली जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लांजाचे वनपाल सारीक फकीर हे सहकाऱ्यांसह दाखल झाले. दरम्यान, बसच्या धडकेत मृत्यू झालेला गवा हा नर जातीचा असून तो 2 ते 3 वर्षाचा असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने या मृत गव्याला महामार्गावरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या शासकीय नर्सरीत या गव्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.








