बेळगाव :
मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींचा गौरव समारंभ व पालक जागर मेळावा नुकताच झाला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू होत्या. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच 2024-25 च्या एसएसएलसी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत ए. एस. चव्हाण यांनी केले. प्रमुख वक्ते अरविंद पाटील यांनी यश मिळविण्यासाठी खडतर परिश्रमाची गरज असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे गुरुनाथ किरमिटे व महेश सावी यांनी गुणवंत विद्यार्थिनींसाठी मानचिन्ह देऊन शाळेला सहकार्य केले. सूत्रसंचालन एस. पवार यांनी केले. के. के. फडके यांनी आभार मानले.









