पाच दुचाकी व एक कार जप्त
पणजी : कळंगूट पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकी चोरी प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश केला असून दोन संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून सुमारे दहा लाख ऊपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून, आज त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशdियातांमध्ये संजय कळके (दोणवडे करवीर कोल्हापूर महाराष्ट्र), सद्दाम खुदबुद्दीन जमादार (उचगाव, कोल्हापूर महाराष्ट्र) यांचा समावेश असून संशयितांनी गुह्याची कबुली दिली आहे. बागा कळंगूट येथे संशयितांनी तक्रारदाराची ब्लू कलरची होंडा अॅक्टिव्हा 6जी स्कूटर भाड्याने घेतली होती. तसेच तक्रारदाराच्या मित्राची ग्रे कलरची माऊती कार देखील घेतली, नंतर ठरलेल्या वेळेत दोन्ही वाहने परत केली नाही. संशdियातांना तक्रादाराला बनावट फोन नंबर तसेच बनावट ओळखपत्र दिली होती. भाड्याने दिलेली वाहने ठरलेल्या वेळेत परत न आल्यामुळे वाहन मालकांनी वाहनांचा तपास करणे सुऊ केले होते. संशयितांनी दिलेल्या फोन नंबरवर फोन केला असता दोन्ही नंबर बंद असल्याच आढळून आले. तसेच ओळखपत्रही बनावट असल्याचे कळताच वाहन मालकांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली, पोलिसांनी अज्ञात संशdियातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आणि तपास कामाला सुऊवात केली होती. कळंग्tढट पोलीस स्थानकाचे निरीक्षक दत्तगुऊ सावंत यांच्या देखरेखीखाली हवालदार सतीश सावंत, कॉन्स्टेबल महेंद्र चारी आणि गौरव चोडणकर यांनी संशयितांना उचगाव, कोल्हापूर येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कार व होंडा स्कूटर जप्त करण्यात आली. अधिक चौकशी केली असता आणखी 4 दुचाकी गोव्यातून आणल्याचे उघड झाले. नंतर त्या जप्त करण्यात आल्या. गोव्यातून भाड्याने कार/बाईक घेणे आणि त्याचा रंग आणि नोंदणी क्रमांक बदलणे ही त्यांची कार्यपद्धती असल्याचे उघड झाले आहे. कळंगूट पोलीस पुढील तपास करीत आहेत.









