दुरुस्त केलेल्या रस्त्यात पुन्हा खड्डे पडल्याने रस्त्याच्या निकृष्ट कामाचा दर्जा उघड : वाहनधारकांना रस्ता धोकादायक
वार्ताहर /कणकुंबी
गेल्या दोन वर्षापासून बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्याला लागलेला वनवास संपलेला नसून यावषी रणकुंडये क्रॉस ते चोर्लापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पावणेतीन कोटी ऊपयांचा निधी खर्च करूनसुद्धा ख•dयात गेल्याने पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी त्रासदायक अवस्था झाली आहे. बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यावर मागीलवषी पावसाळ्यात पडलेले खड्डे दुऊस्ती कामाला यावषी फेब्रुवारी महिन्यानंतर सुऊवात करण्यात आली. रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पावणेतीन कोटी ऊपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर रस्त्याचे कंत्राटदार धारवाडच्या व्यंकटेश कंपनीने घेतले होते. फेब्रुवारी महिन्यात रणकुंडये क्रॉसपासून रस्त्याच्या कामाला सुऊवात करण्यात आली होती. कसेबसे दहा मार्चपर्यंत चिखले क्रॉसपर्यंत रस्त्याच्या दुऊस्तीपैकी मोठेमोठे खड्डे बुजविण्यात आले. त्यानंतर मात्र अडीच महिना रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. उन्हाळ्यात दोन-तीन महिने काम बंद ठेवून पावसाळ्याच्या सुऊवातीला चिखले क्रॉसपासून चोर्लापर्यंतच्या रस्त्याच्या दुऊस्तीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. पावसाळ्यापूर्वी चोर्ला हद्दीपर्यंत दुऊस्तीचे काम पोहोचवण्यात आले. परंतु घाईगडबडीत केलेल्या कामामुळे सदर रस्ता अवघ्या आठ-पंधरा दिवसांमध्येच खराब होण्यास सुऊवात झाला. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा बाहेर पडला.
ज्यावेळी रस्त्याच्या दुऊस्तीच्या कामाला सुऊवात करण्यात आली. त्याचवेळी ‘तऊण भारत’मधून सदर कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल प्र्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. परंतु झोपी गेलेल्या जनतेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अवघ्या महिनाभराच्या आत चोर्ला रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा डोके वर करून उभे राहिले. महिन्याच्या आत पुन्हा त्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाचा दर्जा सिद्ध झाला आहे.
प्रामुख्याने कणकुंबी ते चोर्ला या 12 कि. मी. रस्त्यावर तलावाप्रमाणे खड्डे निर्माण झालेले असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या… असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आलेली आहे. मागीलवषी ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले होते ते उखडून काढून त्याचं पुनर्रडांबरीकरण करण्यात आले. परंतु रस्त्यावरील लहान असलेले खड्डे दुऊस्ती करण्याऐवजी तसेच ठेवण्यात आले होते. यासंदर्भातसुद्धा ‘तऊण भारत’मधून आवाज उठवण्यात आला होता. मात्र कंत्राटदाराने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने मागीलवषीचे खड्डे बरे, परंतु यावषीचे खड्डे नको, अशी अवस्था होऊन बसली आहे. खराब झालेल्या ठिकाणचा रस्ता उखडून काढून नवीन केलेल्या ठिकाणी पुन्हा मोठेमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविताना कसरत करावी लागत आहे.
कणकुंबी वनखात्याच्या नर्सरीजवळ रस्त्याची अवस्था पाहता तसेच चौकी ते चोर्ला रस्त्याची अवस्था पाहिली तर या रस्त्यावरून पुन्हा वाहन घालण्यास वाहनधारकांच्या अंगावर काटा उभा राहतो. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर निदान रस्त्याच्या दुऊस्तीचे काम चांगल्या पद्धतीचे झाले असते. मात्र झोपी गेलेली जनता व बेजबाबदार प्रशासन यांच्यामुळे रस्त्याची अवस्था जैसे थे… अशी झाली आहे. यासाठी पावणेतीन कोटी ऊपयांचा खर्च पूर्णपणे वाया गेलेला असून कंत्राटदाराने उन्हाळ्यात हाती घेतलेले कामसुद्धा अर्धवट राहिलेले आहे. रस्त्याच्या दुतर्फा टाकलेले मातीचे ढिगारे तेही त्याच अवस्थेत आहेत. तसेच काही ठिकाणी गटाराचे नियोजन नाही तर काही ठिकाणी रस्त्याला लागून मागील पावसाळ्यात पडलेल्या मोठमोठ्या चरी जशाच्या तशाच आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने नेमके पावणेतीन कोटी ऊपये कशासाठी खर्च केले, या प्रश्नाचे उत्तर अनुतरीत आहे. सद्यस्थितीत जर रस्त्यावर पडलेले ख•s बुजवण्यात आले नाहीत तर येत्या पंधरा-वीस दिवसांत बेळगाव, चोर्ला, पणजी वाहतूक ठप्प होण्याची शक्मयता आहे. तेव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुऊस्तीचे काम पुन्हा हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.









