गरोदर राहिल्यावर पत्नीने पुरविल्या गर्भपाताच्या गोळ्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याविऊद्ध गुन्हा दाखल केला आहे. 2020 ते 2021 या कालावधीत अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अधिकाऱ्याच्या पत्नीचाही सहभाग समोर आला आहे.
पोलिसांनी लैंगिक गुह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो कायदा) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी अधिकारी दिल्ली सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागात उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर) म्हणून कार्यरत होता.
बारावीत शिकणारी पीडित मुलगी 2020 मध्ये दिल्लीतील एका चर्चमध्ये आरोपी अधिकाऱ्याला भेटली होती. त्यावेळी अल्पवयीन पीडिता आपल्या वडिलांच्या निधनामुळे शोकसागरात बुडाली होती. याचदरम्यान आरोपी अधिकाऱ्याने पीडितेच्या भावनिक दुर्बलतेचा फायदा घेत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. आरोपी पीडितेला घेऊन घरी येऊ लागला. एफआयआरनुसार, डेप्युटी डायरेक्टरने 2020 ते 2021 या कालावधीत 14 वषीय पीडितेवर अनेकदा बलात्कार केला. यादरम्यान पीडित मुलगी गरोदर राहिली. पीडित मुलीने आपण गरोदर असल्याचे समजताच आरोपी उपसंचालकाच्या पत्नीला हा प्रकार सांगितला. मात्र पोलिसांना घटनेची माहिती देण्याऐवजी तिने ही घटना लपविण्यास सुऊवात केली. तिने अल्पवयीन पीडितेला गप्प करत गर्भपातासाठीची औषधेही पुरविल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. तसेच पीडित युवतीच्या आईने आता या घटनेबाबत माहिती दिली आहे. गर्भपाताच्या औषधांमुळे मुलीची तब्येत बिघडल्यानंतर आपण मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.









