मोठी दुर्घटना टळली
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशात बुधवारी एक मालगाडी रुळावरून घसरली आहे. परंतु या दुर्घटनेमुळे कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. थडी आणि अंकापल्लेदरम्यान बुधवारी सकाळी मालगाडी रुळावरून घसरल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मालगाडी रुळावरून घसल्यावर रेल्वेचे पथक संबंधित ठिकाणी रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याचे काम करत आहे. या दुर्घटनेमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरीही अनेक रेल्वेफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तर अनेक रेल्वेगाड्यांची वेळ बदलण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. या दुर्घटनेमुळे आंध्रप्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका प्रवाशांना बसला असून त्यांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने अनेक पावले उचलली आहेत.









