अमेरिकेत एका महिलेने स्वत:च्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावरील टॅटू कापून काढून घेतला, मग त्याला फ्रेम करत घरात टांगला आहे. याहून चांगली स्मरणीय गोष्ट आणखी असू शकत नाही, याच्यासोबत राहिल्याने ते नेहमी आमच्यासोबत असल्याचे वाटते असे उद्गार या महिलेने काढले आहेत. वेस्ट वर्जीनिया येथील नर्स आणि एका मुलाची आई एंजेलिका राडेवसकीने चालू वर्षाच्या प्रारंभी स्वत:च्या पतीला आकस्मिक स्वरुपात गमाविले होते. यानंतर तिने एक साहसी निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने लाखो लोक हैराण झाले आहेत. तिने स्वत:च्या पतीच्या टॅटूयुक्त त्वचेच्या एका तुकड्याला संरक्षित केले आणि त्याला फ्रेममध्ये लावले आहे.
35 वर्षीय एंजेलिका आणि टीजे यांनी 2021 मध्ये विवाह केला होता. त्यापूर्वी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. विवाहापूर्वी एंजेलिकाकडे टीजेच्या 10 वर्षीय मुलगा प्रेस्टनच्या पालनपोषणाची जबाबदारी होती. मार्च महिन्यात 55 वर्षीय टीजेचा अचानक मृत्यू झाला. एंजेलिका स्वत:च्या पतीचे कुठलेही पारंपरिक स्मृतिचिन्ह इच्छित नव्हती, याऐवजी तिने पतीच्या त्वचेला फ्रेम करवून घेण्याची इच्छा बाळगली होती. एंजेलिकाने टीकटॉक व्हिडिओत याचा खुलासा केला.
पतीच्या शरीरावर होते 70 टॅटू
टीजेने स्वत:च्या शरीरावर 70 हून अधिक टॅटू काढून घेतले होते. परंतु त्यांनी पिट्सबर्ग स्टीलर्स हेल्मेटचे डिझाइन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, यात कवटीची प्रतिमा सामील होती. याला काळ्या आणि सोनेरी रंगात तयार करण्यात आले होते. हा टॅटू एंजेलिका आणि प्रेस्टन यांना अत्यंत पसंत होता.
आई-मुलाने घेतला निर्णय
प्रेस्टननेच अखेर या टॅटूसाठी अंतिम निर्णय घेतला. प्रेस्टनने फ्रेम करविण्यात आलेल्या टॅटूला व्हिडिओत दाखवत स्वत:च्या आईला हे पिता असल्याचे म्हटले होते. अंत्यसंस्कारानंतर एंजेलिकाने एका मार्करद्वारे टीजेच्या उजव्या हातावर त्या टॅटूची अचूक रुपरेषा तयार केली, ज्याला ती संरक्षित करू इच्छित होती. मग एका शवचिकित्सकाने काळजीपूर्वक त्वचा हटविली, त्याला ओहायो येथील कंपनी सेव माय इंक फॉरएव्हरकडून उपलब्ध करविण्यात आलेल्या एका विशेष संरक्षण किटमध्ये ठेवले आणि टीजेच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कारापूर्वी ते पाठविण्यात आले.
टॅटू प्रिझर्व्ह करण्यास 90 दिवस
टॅटूला प्रिझर्व्ह करण्याच्या प्रक्रियेत जवळपास 90 दिवस लागले. कंपनीने फ्रेमयुक्त टॅटू परत केला, जो काचेत होता आणि दाट रंगाच्या लाकडी फ्रेममध्ये जडविण्यात आला होता, हा क्षण अत्यंत भावुक करणारा होता. जेव्हा हा टॅटू देण्यात आला, तेव्हा आम्ही हरवून गेलो. टॅटूत अद्याप टीजेच्या त्वचेची बनावट, सुरकुत्या, विखुरलेले केसही होते असे एंजेलिकाने सांगितले. हा फ्रेम करविण्यात आलेला टॅटू आम्हाला तीव्र शारीरिक आणि भावनात्मक बंध प्रदान करतो, जो कुठल्याही कलशापासून प्राप्त झाला नसता, असे एंजेलिका आणि प्रेस्टनने सांगितले.









