दिघंची / वार्ताहर
आटपाडी तालुक्यामधील दिघंची येथे वारकऱ्यांच्या दिंडीत स्विफ्ट गाडीच्या धडकेने एक लहान बालका सह तीन वारकरी जखमी झाल्याची घटना मंगळवारी 5 वाजता घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत स्विफ्ट चालकावर आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.
कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथील दिंडी पंढरपूर कडे निघाली होती. सदर वारी दिघंची येथे आली असता हनुमान स्टीलजवळ मायणीकडून येणाऱ्या स्विफ्ट ( एपी 31 डीएम 9722 ) या कारने धडक दिल्याने भिमराव पांडुरंग जाधव, धनाजी राजाराम मोहिते वय, शिवाजी मारुती मोहिते, सर्व राहणार मोहिते वडगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली हे तिघे जण जखमी झाले. स्विफ्टचा वाहन चालक भानुदास दशरथ थोरात ( मु.पो.- रहाटणी तालुका खटाव, जिल्हा सातारा) याच्याविरोदात गुन्हा दाखल झाला आहे. सदर अपघाताची माहिती समजताच नागरिकांनी गर्दी केली. जखमीना तात्काळ आटपाडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.यावेळी डॉ उमाकांत कदम यांनी जखमीना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवले.








