खानापूर प्रतिनिधी : खानापूर तालुका भाजपच्या वतीने गुरुवार 14 रोजी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा पाळण्यात येणार असून, या पंधरा दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी यावेळी दिली 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत पंधरा दिवसात रक्तदान ,झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा ,टीबी ,अक्षय रोगाचे निर्मूलन यासाठी उपक्रम राबवणे यासह विविध उपक्रम या पंधरा दिवसात राबवण्यात येणार असल्याचे यावेळी संजय कुबल यांनी सांगितले. तसेच तालुक्यात भाजपसाठी योगदान दिलेल्यांचाच उमेदवारीसाठी विचार करण्यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी कटिबद्ध असून याबाबत आम्ही राज्य पातळीवरील जेष्ठ नेत्यांना भेटणार आहोत तसेच कर्नाटक राज्याचे प्रभारी अरुण सिह यांना भेटून तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्यात यावी असे निवेदन देणार असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी सांगितले. यावेळी बाबुराव देसाई, किरण येळ्ळुरकर ,सुरेश देसाई, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









