एखाद्या गावाला देशातील सर्वात सुंदर गाव म्हणून ओळखले जाते, याचबरोबर या गावाला सर्वात दुर्गंधयुक्त म्हणूनही ओळखले जाते. या गावाचे सौंदर्य कायम आहे, परंतु येथील लोक दुर्गंधाने त्रस्त आहेत. हे गाव भारत किंवा अन्य विकसनशील देशात नसून ब्रिटनसारख्या विकसित देशात आहे. या गावात इतकी दुर्गंधी का याचा खुलासा अलिकडेच झाला आहे. शैल्फोंट सेंट जाइल्स बकिंघम- शायरमध्ये वसलेले एक सुंदर गाव आहे. याला बकिंघमशायरमध्ये सर्वश्रेष्ठ संरक्षित गाव म्हणून सन्मानितही करण्यात आले आहे. परंतु या सुंदर गावात राहणारे लोक उष्णतेसोबत येथील आणखी खराब होणाऱ्या गंधामुळे त्रस्त आहेत.
शैल्फोंट सेंट जाइल्स छोटे गाव असून येथे 4700 लोक राहतात. या गावात या लोकांना सातत्याने दुर्गंधासोबत रहावे लागते, तसेच याचे परिणामही भोगावे लागतात. नदीच्या काठावरील मार्ग, मुलांचे क्रीडामैदान आणि बदकांचे तलाव सर्वकाही बंद करण्यात आले आहे. दुर्गंधामुळे 2024 च्या सर्वश्रेष्ठ संरक्षित गावाच्या स्पर्धेतून याला वगळण्यात आले आहे. हा दुर्गंध का येतो हे आता स्पष्ट झाले आहे. पूर्वी पूराच्या मैदानात असलेल्या स्थिर पाण्यामुळे हा दुर्गंध येत असल्याचे मानले जात होते, परंतु थेम्स वॉटर मिसबोर्न नदीत रॉ सीव्हेज सोडण्यात येत होते, ज्याचा प्रवाह गावामधून वाहतो. हा गंध छोट्याशा गावातील चहुबाजूला फैलावतो. येथे ओव्हरफ्लो टँकचा वापर नाल्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला नियंत्रित करण्यासाठी केला जात होता.
हा प्रवाह पूर्वी मिसबोर्न नदीत सामावला जायचा, परंतु यंदा जानेवारी महिन्यात वादळामुळे ओव्हरफ्लो वाढला आणि जुन महिन्यातच संपुष्टात आला. ही समस्या आता गंभीर मुद्दा ठरली आहे, याचमुळे ‘थेम्स वॉटर’ने माफी मागितली आहे.









