बेळगाव ; ऐन गणेशोत्सव काळात नैर्त्रुत्य रेल्वेने मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेळगाव-मिरज मार्गावरील अनेक अनारक्षित एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढलेली असताना मेगाब्लॉक केल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. हुबळी-मिरज एक्स्प्रेस दि. 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. मिरज-कॅसलरॉक दि. 22 ते 26, कॅसलरॉक-मिरज दि. 22 ते 26, मिरज-हुबळी दि. 23 ते 27 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस दि. 21 ते 25 दरम्यान बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस दि. 22 ते 26 दरम्यान बेळगावमधून निघणार आहे. मिरज-बेंगळूर एक्स्प्रेस दि. 22 ते 24 दरम्यान 40 मिनिटे तर 26 रोजी 60 मिनिटे उशिराने धावेल. एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस दि. 25 रोजी 60 मिनिटे उशिराने धावेल. निजामुद्दिन-म्हैसूर एक्स्प्रेस 25 रोजी सोलापूरमार्गे वळविण्यात आली आहे. प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकानुसारच प्रवास करावा, असे नैर्त्रुत्य रेल्वेने कळविले आहे. परंतु, ऐन गणेशोत्सवात नैर्त्रुत्य रेल्वेने पाच दिवसांचा मेगाब्लॉक केल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.
Previous Articleसभागृहात पुन्हा रंगले मानापमान नाट्या
Next Article ‘एसएफएस’ जिल्ह्यात करणार 250 कोटींची गुंतवणूक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









