आचरा | प्रतिनिधी
सर्जेकोट येथील मच्छीमार नौका आचरा समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाली. अजस्त्र लाटांच्या तडाख्याने नौकेतील चारही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. त्यातील तीन मच्छिमार बेपत्ता असून एक मच्छिमार बचावला आहे. उर्वरित तीन मच्छीमारांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक मच्छीमारांकडून शोध कार्य सुरू करण्यात आले आहे









