अथेन्स
ग्रीसची राजधानी अथेन्सच्या उत्तर उपनगरात भीषण आग लागली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. अथेन्सपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावरील लेक मॅराथॉननजीक लागली होती आणि तेथून माउंट पेंडेलीला पार करत ही आग राजधानीच्या उत्तरीय उपनगरांपर्यंत पोहोचली. आगीत अनेक घरे आणि दुकाने जाळून खाक झाली आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.









