कोरापूट : ओडिशाच्या कोरापूटमध्ये एसएलएन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शुक्रवारी आग लागली आहे. आग लागल्याचे कळताच रुग्णांमध्ये खळबळ उडाली. स्पेशल चाइल्ड केअर वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती. या दुर्घटनेत कुणीच जखमी झालेले नाही. चाइल्ड केअर वॉर्डमधील 42 नवजातांना त्वरित अन्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले असून स्थिती आता नियंत्रणात असल्याचे रुग्णालयाचे अधिष्टाता सुशांत कुमार साहू यांनी सांगितले आहे.
Previous Articleविधानसभेत नमाजासाठी मिळणार नाही ब्रेक
Next Article तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून बिनशर्त माफी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









