सुमारे 10 लाखांचे नुकसान : परिसरातून हळहळ
वार्ताहर / उगार खुर्द
ऐनापूर येथील बॅटरी इन्व्हर्टर दुऊस्ती करण्याच्या दुकानाला आकस्मिक आग लागल्याची घटना गुऊवारी सायं. 7.30 च्या सुमारास घडली. या घटनेत दुकानातील सुमारे 10 लाखांचे साहित्य आगीत खाक झाले आहे. धोंडीबा हरळे असे नुकसान झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, नेहमीप्रमाणे धोंडीबा आपल्या दुकानातील काम आटोपून सायंकाळी घरी गेले होते. आकस्मिकरित्या लागलेल्या आगीमुळे दुकानातून धुराचे लोळ बाहेर पडू लागले. त्याची माहिती नागरिकांनी तात्काळ हरळे यांना कळविली. त्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. पण आगीने क्षणात रौद्रऊप धारण केले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत दुकानातील सुमारे 10 लाखांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेमुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.









