प्रतिनिधी/ बेळगाव
महाद्वार रोड येथील एका स्पेअरपार्टच्या दुकानाला आग लागून 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
महाद्वार रोड येथील उज्जयनी इंटरप्रायझेस या स्पेअरपार्टच्या दुकानाला आग लागली. या दुकानातून धूर येत असल्यामुळे काही जणांनी संबंधित मालकाला फोन केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले आणि बघताबघता दुकानातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलालाही तातडीने कळविण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे आगीमध्ये जवळपास 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.









