रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील जुने भाजीमार्केट येथे गांजा बाळगल्याच्या स्थितीत सापडलेल्या आरोपीला न्यायालयाने 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान (32, ऱा मिरकरवाडा रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आह़े रत्नागिरी पथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा.
खटल्यातील माहितीनुसार, 16 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रीच्या सुमारास शहर पोलिसांचे पथक शहरात गस्त घालत होत़े रात्री 9 च्या सुमारास जुने भाजीमार्केट येथील शाळा क्रमांक 1 च्या मागील बाजूला मोहम्मद मस्तान हा संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना दिसल़े यावेळी त्याची अंगझडती घेण्यात आली असता त्याच्याकडून 3 ग्रॅम गांजासदृश पदार्थ आढळल़ा पोलिसांकडून मोहम्मद मस्तानविरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 (क),27 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा न्यायालयाने मोहम्मद याला दोषी मानून 5 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावल़ी सरकारी पक्षाकडून ॲड. प्रज्ञा तिवरेकर यांनी युक्तीवाद केल़ा तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिल़े









