गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी पेंद्रीय कायदेमंत्री अॅड रमाकांत खलप यांचे मत
नाशिक : लोकमान्य सोसायटी ही फक्त आर्थिक योजना राबवत नाही तर आपली सामाजिक जबाबदारी ओळखून लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळेच अर्थकारण आणि समाजकारणाचा सुरेख संगम लोकमान्यमध्ये पाहायला मिळत असल्याचे मत गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी पेंद्रीय कायदेमंत्री अॅड रमाकांत खलप यांनी व्यक्त केले आहे. नाशिकमधील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या विभागीय कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी विविध विषयावर संवाद साधला. कार्यालयाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकमान्य नाशिकचे विभागीय व्यवस्थापक प्रकाश चित्तोडकर, समन्वयक हेमंत फडके यांनी खलप यांचे स्वागत केले. बँकेकडून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी लोकमान्यचे अध्यक्ष किरण ठाकुर हे आपल्या नावप्रमाणेच ऊर्जा देणारे ’किरण‘ आहेत असे सांगत खलप यांनी आदर व्यक्त केला. तर लोकमान्यविषयी बोलतांना लोकमान्यमध्ये नेहमीच सामान्य नागरिक पेंद्रस्थानी ठेवून काम केले जाते. त्याच्या सोयी, गरजा ओळखून योजना राबविल्या जातात. त्यामुळेच लोकमान्यवर नागरिकांचा मोठा विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गोवा राज्यातल्या दुर्गम भागातील 34 खेडी लोकमान्यने दत्तक घेतली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार निर्मीती करता वेगवेगळ्या लघुउद्योगांची उभारणी लोकमान्यकडून केली जात आहे. ही अतिशय प्रेरणादायी गोष्ट असल्याचे यावेळी खलप यांनी सांगितले.









