शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : कुटुंबीयांचा आक्रोश

प्रतिनिधी /बेळगाव
औरंगाबाद येथील लष्करी इस्पितळात हृदयाघाताने निधन झालेल्या मेलमट्टी (ता. गोकाक) येथील लष्करी जवान शंकर बाळाप्पा यलीगार (वय 33) यांच्या पार्थिवावर बुधवारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुधवारी शंकर यांचे पार्थिव मेलमट्टी येथे पोहोचताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी एकच आक्रोश केला. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांच्यासह सरकारी अधिकाऱयांनी अंत्यदर्शन घेतले. औरंगाबाद येथे सेवेत असताना हृदयाघाताने शंकर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे मेलमट्टीसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.









