साँग्स ऑफ पॅराडाइज ओटीटीवर झळकणार
प्राइम व्हिडिओने आता स्वत:चा आगामी चित्रपट ‘साँग्स ऑफ पॅराडाइज’च्या प्रीमियरची घोषणा केली आहे. हा चित्रपट काश्मीरच्या लोकप्रिय गायिका राज बेगम यांची खास कहाणी दाखविणारा असेल. एक्सेल एंटरटेन्मेंट आणि अॅप्पल ट्री पिक्चर्सकडून निर्मित या चित्रपटाची कहाणी संगीत, हिंमत आणि काश्मीरच्या पहिल्या पार्श्वगायिकेचा निर्धार मांडणारी आहे. राज बेगम यांनी काश्मिरी महिलांना प्रेरित करण्यासह गायनक्षेत्रात एक नवी दिशा प्रस्थापित केली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शन दानिश रेनजू यांनी केले आहे. तर चित्रपटात सबा आझाद आणि सोनी राजदान मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. जन खान दुर्रानी, शीबा चड्ढा, तारुक रैना आणि लिलेट दुबे हे कलाकारही चित्रपटात काम करणार आहेत.
साँग्स ऑफ पॅराडाइज 29 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक नवी आणि भावनात्मक कहाणी सादर करतो, जो काश्मीरच्या समृद्ध संगीत परंपरेवर आधारित आहे आणि यात आकर्षक वारसा अन् अभिनय असल्याचे निर्मात्यांकडून म्हटले गेले आहे.









