अन्य एकजण गंभीर जखमी
वृत्तसंस्था/ बांदिपोरा
जम्मू-काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यात रविवार, 17 सप्टेंबर रोजी लष्कराच्या एका जवानाने चुकून आपल्या सर्व्हिस रायफलमधून गोळीबार पेल्यामुळे एक जवान हुतात्मा झाला, तर अन्य एकजण जखमी झाला. बांदिपोरा जिल्हा पोलिसांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. हे प्रकरण 14 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीशी संबंधित आहे. रविवारी पॅम्पमध्ये एका सैनिकाची रायफल चुकून जमिनीवर पडल्यामुळे रायफलमधून गोळीबार झाला. या गोळीबारात दोन जवानांना गोळ्या लागल्या. दोघांनाही तातडीने ऊग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले. तर अन्य एकावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर रायफलधारी जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रोटोकॉलनुसार कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर छावणीत उपस्थित असलेल्या इतर जवानांचीही चौकशी केली जात आहे. ही घटना कशी घडली याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.









