बेळगाव प्रतिनिधी: आमदार अनिल बेनके पुरस्कृत दसरा क्रीडा व सांस्कृतीक मोहत्सवाअंतर्गत भव्य आंतरराज्य ढोलताशा वादन स्पर्धेस शुक्रवारी मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. आमदार अनिल बेनके व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .दि. 7 ते 9 ऑक्टोबर अशी 3 दिवस ही स्पर्धा चालणार असून उद्घाटन प्रसंगी वादकांनी अत्यंत चुरशीने ढोलताशा वादनाचे प्रदर्शन केल्याने बेळगावकरांना पारंपारिक वाद्याची मेजवानी लाभली. या स्पर्धेसाठी मैदानावरील व्यासपीठावर ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे . आज पहिल्या दिवशी शिवदैवत ढोलताशा पथक तुरमुरी व वक्रतुंड ढोलताशा पथक खानापूर यांचे सादरीकण झाले. ढोलताशांच्या गजराने संबंध परिसर दणाणून निघाला. या स्पर्धेस प्रेक्षकांचा उlस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे . सरदार मैदानावर आयोजित ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली हा॓ती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









