शरीरावर मुलीच्या नावाचे असंख्य टॅटू
विश्वविक्रमी कामगिरी करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. आतापर्यंत तुम्ही अनेक विश्वविक्रमांबद्दल ऐकले असेल. ब्रिटनमधील 49 वर्षीय व्यक्तीच्या शरीरावर एकाच नावाचे सर्वाधिक टॅटू काढून घेण्याचा विश्वविक्रम नेंद झाला आहे. मार्क ओवन इवांसने स्वत:च्या शरीरावर एकूण 677 वेळा मुलीचे नाव गोंदवून घेतले आहे. 2017 मध्ये इवांसने स्वत:ची मुलगी लुसीचे नाव स्वत:च्या पाठीवर 267 वेळा गोंदवून घेतले होते. परंतु 2020 मध्ये हा विक्रम मोडीत निघाला होता. तेव्हा अमेरिकन डिएड्रा विजिलने स्वत:च्या नावाचा 300 वेळा टॅटू काढून घेत नवा विक्रम केला होता. यामुळे इवांस पुन्हा एकदा स्वत:च्या नावावर हा विक्रम करू पाहत होते. याचमुळे त्यांनी पाठीवर नवे टॅटू काढून घेण्यासाठी स्वत:च्या मांड्यांवर नवे टॅटू काढून घेण्याचा निर्णय घेतला.
इवांस यांनी सर्व 400 टॅटू पूर्ण करण्यास साडेपाच वर्षांचा कालावधी लागल्याचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सला सांगितले आहे. त्यांच्या दोन्ही पायांवर आता प्रत्येकी 200 टॅटू आहेत.
विक्रम पुन्हा माझ्या नावावर करण्याची आणि तो स्वत:च्या मुलीला समर्पित करण्याची अधिक प्रतीक्षा करू शकत नव्हतो. ब्रेक्सहॅममध्ये डेक्सटेरिटी इंकच्या दोन कलाकारांनी याकरता मदत केल्याचे इवांस यांनी सांगितले आहे.









