दुकानवाड : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील शिवापूर- राऊळवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ(४८) हा शेतकरी बुधवारी गुरे चरायला घेऊन गेला होता. सायंकाळी घरी परतत असताना कर्ली नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला .त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी वाहुन गेलेल्या ठिकाणापासुन दिड किलोमीटर अंतरावर सापडला आहे.
तुकाराम राऊळ हे सकाळी आपली गुरे चरायला घेऊन शिवापूर गाव्हाळ भागात(कर्ली नदीकाठी)गेले होते. दुपारचा जेवणाचा डबा सोबत नेला असल्याने ते एकदम सायंकाळी गुरांसह घरी परतत होते,मात्र बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाही.त्यांची गुरे घरी परतली. यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांचा शोध घेतला श्री.राऊळ घरी आलेच नाहीत हे.स्थानिक ग्रामस्थांना समजतात त्यांनीही तुकाराम राऊळ याचा शिवापूर गाव्हाळ भागात कर्ली नदी किनारी शोध घेतला . गुरुवारी सकाळी शिवापूर गावातील ग्रामस्थांनी तुकारामचा शोध सुरु केला असता बंधाऱ्याला त्यांचा मृतदेह अडकलेल्या स्थितीत आढळून आला.









