सुरेश पाटील/ पुलाची शिरोली
Kolhapur : हातकणंगले येथील शासकीय जागेवर ड्रायपोर्ट साकारल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी,उद्योजक,व्यावसायिक,व्यापारी यांना वरदान ठरणार आहे.पण यासाठी गरज आहे ती लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची.ड्रायपोर्ट हा सागरी मार्ग,रेल्वे मार्ग व रस्ते मार्ग या तिन्ही मार्गाला जोडणारा दुवा म्हणून ओळखला जातो.समुद्रा मार्गे येणाऱ्या वस्तू अथवा माल शहरात अत्यंत सहज व सुलभतेने पोहचविण्यासाठी पोर्टचा चांगला उपयोग होऊ शकतो.यामध्ये वाहनांचा व रेल्वे मार्गाचा वापर अत्यंत सोईचा व सहज करता येतो.तसेच येथे ड्रायपोर्ट तयार झाल्यास कृषी मालाच्या निर्यातीसाठी वरदान ठरणार आहे. अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी हातकणंगले गावाजवळ असलेल्या पाचशे एकर शासकीय जागेवर ड्रायपोर्टची उभारणी करावी अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी ट्रक व्यावसायिकांच्या वतीने केंद्रीय रस्ते विकास व दळणवळण मंञी नामदार नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रात सर्व सोईंनी परिपूर्ण असे (आयात-निर्यात केंद्र) ड्रायपोर्ट अस्तित्वात नाही.त्यामुळे येथील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसान व ञास सहन करावा लागत आहे.हे पोर्ट उभारल्यास उद्योजक,व्यावसायिक ,शेतकरी व चालकांना एकाच छताखाली सर्व सोई सुविधा उपलब्ध होणार आहेत.यामध्ये शितगृहे,गोडावून, पेट्रोल व डिझेल पंप,मॉल्स, वस्तीगृहे, हॉटेल्स, कंटेनर दुरुस्तीची सोय,कंपन्यांची ऑफिस आदींचा समावेश असणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वाहन तळाचा मोठा फायदा होणार आहे.पिकविलेला भाजी-पाला, द्राक्षे, डाळिंब, केळी, चिक्कू अशी फळे, गुळ ,साखर, सुत, कापड, औद्योगिक वसाहतीतील स्पेअर पार्ट, वस्तू अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची देवाण-घेवाण अत्यंत सुलभ-सोपी व विश्र्वसनीय होण्यास मदत होणार आहे.तसेच सर्व प्रकारच्या मालाची वेळेत ने आन होण्यास मदत होणार असल्याने सर्वच क्षेत्रातील लोकांचे वेगवेगळ्या कारणांमुळे होणारे नुकसान टळणार आहे.तसेच कोल्हापूर रत्नागिरी हा चारपदरी महामार्ग बांधणी युद्ध पातळीवर सुरू आहे.त्यामुळे येथील माल समुद्रमार्गे एक्स्पोर्ट करण्यास फार मदत होणार आहे.तसेच मंञी गडकरी यांनी त्याठिकणचा भाजी पाला,फळे,औद्योगिक स्पेअर पार्ट ,सुत,कापड अशा वेगवेगळ्या वस्तुंची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रसंगी रेल्वे लाईन टाकण्याचाही विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
हातकणंगले येथील ड्रायपोर्ट साकारल्यास आयात-निर्यात वाढण्यास मदत होईल,उद्योजक व शेतकऱ्यां ना याचा चांगला फायदा होईल,अनेक लोकांना रोजगार व लहान मोठे व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होईल.
दिलीप शिरोळे ,वरद लॉजिस्टीक शिरोली एमआयडीसी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









