भूमीवरचा सर्वात विषारी जीव नागराज किंवा किंग कोब्रा मानला गेला आहे. पण या नागराजाचे वीषही फिके पडावे असे तीव्र क्षमतेचे वीष असणारा एक मासा समुद्रांमध्ये आढळतो. साधारणत: मासे हे खाण्यासाठी उपयोगात आणले जातात. विविध प्रकारच्या मासे अनेकांच्या आहारात असतात. पण हा मासा खाणे सोडाच, नुसता त्याला स्पर्श जरी झाला तरी माणसाचा मृत्यू अटळ बनतो.

या माशाचे नाव आहे स्टोन फिश. याला असे नाव पडण्याचे कारण असे की तो दूर अंतरावरुन दगडासारखाच दिसतो. तो हालचालही फार कमी करतो. त्याचा स्पर्श झालेला कोणताही जीव किंवा प्राणी जिवंत राहू शकत नाही. माणसाचीही तशीच अवस्था होते. त्याचे हे भयंकर वीष हे त्याच्या संरक्षणाचे देवाने त्याला दिलेले साधन आहे. त्यामुळे व्हेल, शॉर्कसारखे मोठे आणि शिकारी मासेही त्याच्यापासून दूर राहतात. जेथे या माशांचे वास्तव्य आहे, तेथील कोळ्यांना किंवा मच्छीमारांना त्याच्यापासून दूर राहण्याच्या सूचना केलेल्या असतात.
या माशाचा स्पर्श जर इतका जीवघेणा असेल, तर त्याचे प्रत्यक्ष वीष किती उत्पात घडविणारे असेल याची केवळ कल्पनाच आपण करु शकतो. संशोधक असे म्हणतात की त्याच्या विषाचा एक थेंब एका शहरातील सर्व सजीव प्राण्यांना (माणसांसह) जीवानिशी मारण्यासाठी पुरेसा असतो. त्याच्या वीषाचा संपर्क झाल्यास वाचण्याचा एकच मार्ग असतो. तो असा की शरीराच्या ज्या भागाला त्याचा स्पर्श झाला आहे तो भाग क्षणार्धात पूर्ण कापून शरीरापासून वेगळा करणे. कारण अवघ्या काही मिनिटातच त्याचे वीष साऱ्या शरीरभर भिनते.









