नवी दिल्ली :
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 2.8 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. 19 जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 2.795 अब्ज अमेरिकन डॉलरने घसरणीत राहिला होता.
या योगे हा चलन साठा 616.143 अब्ज अमेरिकन डॉलरवर घसरला आहे. देशाचा सुवर्ण साठासुद्धा 34 दशलक्ष अमेरिकी डॉलरने घटून 47.212 अब्ज अमेरिकन डॉलरवर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे.









