प्रतिनिधी / बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिण्याच्या पाण्याची पाईप फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चव्हाट गल्ली परिसराकडे जात आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना, वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. मंगळवारी दुपारपासून ही पाईप फुटली आहे. मात्र त्याची दुरुस्ती करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने इतर ठिकाणी पाईप फुटल्यानंतर दुरुस्ती होते की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









