वृत्तसंस्था/ पॅरीस
स्पेनचा टॉप सिडेड पुरूष टेनिसपटू कार्लोस अल्कॅरेझने 2022 च्या टेनिस हंगामातील एटीपीच्या टॉप सिडेडसाठीचा चषक पटकाविला. सोमवारी येथे सुरु झालेल्या पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेवेळी एटीपीचे चेअरमन अँड्रे गॉडेंझी यांच्या हस्ते हा चषक अल्कॅरेझला प्रदान करण्यात आला.
2022 च्या टेनिस हंगामाअखेर कार्लोस अल्कॅरेझने एटीपीच्या मानांकनातील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. टेनिस क्षेत्रातील माझे हे स्वप्न अखेर खरे झाल्याची प्रतिक्रिया अल्कॅरेझने व्यक्त केली. अल्कॅरेझ आता पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत आपला सहभाग दर्शविणार असून त्याला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. अल्कॅरेझचा दुसऱया फेरीतील सामना जपानच्या निशीओकाशी होणार आहे.









