क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज क्लस्टर विभागीय शहापूर, टिळकवाडी क्रीडा स्पर्धेत आदर्श मराठी विद्या मंदिर शाळेच्या मुलांच्या खो खो संघाने अंतिम सामन्यात के. बी. एस. नं. 5 शाळेचा पराभव करत तर मुलींच्या खो खो संघाने मुक्तांगण इंग्लिश शाळेला 6-4 गुणफरकाने पराभव करुन दुहेरी मुकूट पटकाविले. स्पर्धेत अर्जुन भेकणे, परीट, देवकुमार मंगणाकर, निरंजन कार्लेकर, बापू देसाई, यांनी पंच म्हणून काम केले. आदर्श शाळेचे क्रीडा शिक्षक जे. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. दोन्हीही खो खो संघाना तालुका स्तरावर खेळण्याची संधी प्राप्त झाली. व्ही. बी. एस.चे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी यांनी दोन्हीही संघांचे विशेष अभिनंदन









