युवकांकडून क्रूरपणे हत्या
वृत्तसंस्था/ गाजियाबाद
दिल्लीनजीकच्या गाजियाबादमध्ये दोन युवकांनी एका श्वानाला दोरखंडाने लटकवून ठार केले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकार समोर येताच पोलिसांनी सोमवारी दोन्ही युवकांना चौकशीसाठी बोलाविले आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. व्हायरल व्हिडिओत दोन युवक एका श्वानाला साखळदंडामध्ये बांधून फासावर लटकवित असल्याचे दिसून येते. तर संबंधित श्वान लहान मुले, वृद्धांसह अनेक लोकांचा चावा घेत होता असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेतली असून संबंधित युवकांना चौकशीसाठी बोलाविले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









