५ डिसेंबरनंतर उबाठा सेना अवैध पर्ससीन पकडणार ;वैभव नाईकांचा थेटच इशारा
मालवण -:
अवैध पर्ससीन नेट मासेमारी करणारे सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश करत आहे. अवैध एलईडी पर्ससीन मासेमारीवरील कारवाई टाळण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हा त्यांचा डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. येत्या ५ डिसेंबरनंतर उबाठा सेना अवैध पर्ससीन नौका पकडून दाखवेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. गुरूवारी पोलीस ठाण्यात उपोषणकर्त्या पारंपरिक मच्छीमारांशी विभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक मत्स्य आयुक्त चर्चा करीत असताना नाईक यांनी चर्चेत सहभाग घेत पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.









