82 फूट लांब अन् 39 फूट उंचीचा होता डायनासोर
पोर्तुगालमध्ये एका व्यक्तीला स्वतःच्या जमिनीत खोदकाम करताना डायनासोरची काही हाडं मिळाली. संशोधकांनी यानंतर केलेल्या अध्ययनात हा सांगाडा ब्रॅकियोसोरस या प्रजातीच्या डायनासोरचा असल्याचे आढळून आले. या प्रकारचा डायनासोर सुमारे 82 फूट लांब अन् 10-16 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होता. युरोपमध्ये आतापर्यंत शोधण्यात आलेला हा सर्वात मोठा सॉरोपोड्स असू शकतो. सॉरोपोड्स शाकाहारी डायनासोर होते, ज्यांना त्यांचे चार पाय, लांब मान अन् शेपटीमुळे ओळखले जात होते. अशाप्रकारच्या कुठल्याही प्राण्याची सर्व हाडं एकत्र मिळवणे सामान्य गोष्ट नसल्याचे उद्गार युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बनचे संशोधक एलिसाबेट मलाफिया यांनी काढले आहेत.

डायनासोर, विशेषकरून सॉरोपोड्सप्रकरणी संरक्षणाची ही पद्धत अपेक्षेच्या तुलनेत असाधारण आहे. 2017 मध्ये पोर्तुगालच्या पोम्बलमध्ये एका घरमालकाला स्वतःच्या घराच्या अंगणात निर्मितीकार्य करताना काही हाडांचे तुकडे मिळाले होते. संबंधित घरमालकाने संशोधन पथकाल्शी संपर्क केल्यावर त्यांनी संबंधित ठिकाणी उत्खनन सुरू केले. विस्तृत अध्ययनानंतर आता पोर्तुगाल अन् स्पेनच्या जीवाश्म तज्ञांनी हे अवशेष डायनासोरचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
सॉरोपोड डायनासोर
उत्खननात सापडलेला सांगाडा 39 फूट उंचीचा अन् 82 फूट लांबीच्या सॉरोपोड डायनासोरचा होता. सांगाडय़ातील कण्याचे हाड पाहता तो एक ब्रॅकियोसोरस होता. ब्रॅकियोसोरसचा समूह अप्पर ज्युरासिकपासून लोअर क्रेटेशियस काळापर्यंत राहिला होता. यापूर्वी चीनमध्ये डायनासोरच्या इतिहासाशी निगडित एक महत्त्वाची गोष्ट आढळून आली होती. तेथील परिसरात प्राचीन जीवाच्या पायांचे ठसे मिळाले होते, जे सुमारे 10 कोटी वर्षांपूर्वीचे होते.









