‘जीईसी’च्या विद्यार्थ्यांचे वीज मंत्री ढवळीकर यांच्याकडून कौतुक
पणजी : वीज यंत्रणेच्या नेटवर्कमधील दोष ओळखण्यासाठी आणि दुऊस्त करण्यासाठी वीज विभागात गोवा इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्याथ्थ्यांनी डिझाइन केलेले उपकरण आता वापरात येणार आहे. 11 केव्ही फिडरवरील विभागीय नियंत्रकाचे आज रिमोट कंट्रोलद्वारे उद्घाटन करण्यात आले आहे. हे उपकरण निश्चितच वीज खात्याची ताकद वाढविणारे ठरणार आहे, असा विश्वास वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला. पर्वरी येथील मंत्रालयात राज्याच्या विद्युत विभागासाठी गोवा इंजिनिअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रीक अॅण्ड इलेक्ट्रॉनिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी डिझाइन आणि विकसित केलेल्या 11 केव्ही फीडरवरील विभागीय नियंत्रकासाठी रिमोट कंट्रोलरचे आज उद्घाटन करण्यात आले. डिव्हाइस पॉवर सिस्टम नेटवर्कमधील दोषपूर्ण विभाग ओळखण्यास तसेच कमीतकमी वेळेत दोष दूर करण्यात मदत करण्यात हे उपकरण फार फायदेशीर ठरणार आहे. य्ािंमुळे नेटवर्क यंत्रणा सुधारेल. हे उपकरण सुरक्षित मोबाइल फोन संप्रेषण वापरून 11 केव्ही फिडरवर सेक्शनलायझरच्या रिमोट कंट्रोलला सूचना देईल, अशी माहितीही वीजमंत्री ढवळीकर यांनी दिली. वीज खात्यातील तंत्रज्ञ सेक्शनलायझर दूरस्थपणे ऑपरेट करण्यास सक्षम असतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, उत्पादन विकास कार्याचा एक भाग म्हणून नंदनवन, बेतोडा-फोंडा येथे 11 केव्ही ओपा फीडरवर असे एक उपकरण स्थापित केले गेले आणि त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली असल्याची माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.









