मुंबई :
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 4.8 अब्ज डॉलरची घट झाली आहे. सदरचा विदेशी चलन साठा आता सर्वकालीक उच्चांकापेक्षा कमी दिसून आला आहे. देशाचा विदेशी चलन साठा 9ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये 4.8 अब्ज डॉलर्सने कमी होत 670.119 अब्ज डॉलरवर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 7.533 अब्ज डॉलर्सने वाढून 674.919 अब्ज डॉलर्सवर सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. 9 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील सुवर्ण साठा 86 कोटी डॉलर्सने घटून 59.239 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे.









