मुंबई
विदेशी चलन साठ्यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये पाहता सर्वाधिक घसरण ऑगस्टमध्ये नुकतीच दिसून आली आहे. देशातील विदेशी चलन साठा 18 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये 7.27 अब्ज डॉलर्स घसरणीसह 600 अब्ज डॉलर्सच्या खाली म्हणजेच 594.89 अब्ज डॉलर राहिला होता. दोन महिन्याच्या नीचांकी स्तरावरती घसरण दिसली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी या संदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.









