नगरपरिषदेने उपाययोजना करावी- देव्या सूर्याजी
सावंतवाडी जिल्हा परिषद शाळा नं. २ च्या समोरील आंब्याच्या झाडा शेजारील कठडा कोसळल्याने तो कठडा धोकादायक स्थितीत आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष देत वेळीच योग्य ती उपाययोजना करावी.शाळेच्या प्रवेशद्वारा समोर हे झाड असून वेळीच दक्षता न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.याठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेजारी असलेले वटवृक्ष नेमळेकर यांच्या घरावर कोसळून मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे. तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.









