वार्ताहर / शिवोली
शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मठात भाविकांनी पादुका दर्शनासाठी एकच गर्दी केली. मठात अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वत: वापरलेल्या रक्तचंदनाच्या गुऊवारी पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सकाळी करासवाडा येथील श्री साईबाबा मंदिराजवळ स्वामींच्या पादुकांचे वाजत -गाजत स्वागत झाल्यानंतर स्वामींच्या जयघोषाने व नामस्मरणाने मठात थाटात आगमन झाले. चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज वे.शा.सं. श्री अण्णू महाराज पूजारी व ब्रम्हवृद यांच्या मंत्रोच्चाराने श्री स्वामींच्या पादुकांवर विधीवत पूजा झाली. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी समर्थांची मठाभोवती पालखी प्रदक्षिणा नंतर महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद झाला. रात्री यक्षणी दशावतार नाट्यामंडळ, माणगांव यांच्यातर्फे ‘स्वामीकृपा’ हा नाट्याप्रयोग सादर झाला.









