कणकवली : प्रतिनिधी
वाहतूक ठप्प !
कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात शनिवारी दरड कोसळून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्यासाठी जेसीबी घटनास्थळी दाखल झाला असून दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तहसिलदार दीक्षांत देशपांडे हे घटनास्थळी रवाना झाले आहेत .









